करणच्या मुलांनी घेतली त्याचीच ‘शाळा’ म्हणाले…

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ ऑक्टोबर २०२२ ।  बॉलिवुडचा करण जोहरचा नुकताच एक व्हीडीओ तुफान व्हायरल होत आहे, त्याच्या मुलांसोबत वेळ घालवतांना दिसतो. त्याचे व्हिडिओदेखिल तो पोस्ट करत असतो.असाच एक व्हिडिओ त्याने शनिवारी इंस्टाग्रामवर शेअर केलाय. त्यात तो त्याच्या दोघा मुलांसोबतच्या वीकेंडची मजा घेतांना दिसतोय.

करण जोहर हा नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याला अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करवा लागतो. त्याची एक चुक आणि तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. मग तो त्याचा चित्रपट असो किंवा त्याचा ‘कॉफि विथ करण’ हा शो. या शोला जेवढी लोकप्रियता मिळते,तेवढाच तो त्याच्या उलट सूलट प्रश्नामूळे ट्रोल केला जातो. मात्र तो यावेळी कुण्या बाहेरील व्यक्तीने त्याला काही बोलले नाही तर त्याच्या मूलांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

 

यश आणि रुही खेळत असतांना यश काहितरी बोलतो आणि करणने त्याला विचारतो, ‘काय बोलत होतास? तेव्हा यश म्हणतो,’मी तुला टीव्हीवर पाहिले. तू एवढं खराब का गात होतास?’ करणने विचारलं, ‘मी काय खराब करतोय?’ तेव्हा दोघेही उत्तर दिलं, ‘तू वाईट गात होतास.’ यावर करण जोहर म्हणतो, ‘मी खूप छान गातो. माझा आवाज अप्रतिम आहे, पण मी सुंदर गातो. तुम्हाला माझे गाणे ऐकायचे आहे का?’ दोन्ही मुलं द्विधा मनस्थितीत “हो” म्हणतात त्यानंतर करण ‘अभी ना जाओ छोड कर’ हे गाण्यास सुरूवात करतो. त्याचे गाणे एकल्यानतंर त्यांच्या दोघा मुलांनी कानावर हात ठेवले. करण त्यांना म्हणातो, ‘अरे ऐका ना.’ ते खूप हसतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम