कर्नाटक निवडणूक : कॉंग्रेस नेत्याला आनंद गगनात मावेना अन घडली ती घटना !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ मे २०२३ ।  देशातील कर्नाटकातील जवळपास शेवटच्या टप्यात निकाल समोर येत आहे. या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही तर दुसरीकडे कॉंग्रेसला मोठे यश या निवडणुकीत मिळणार आहे. या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत डी. के. शिवकुमार १ लाख मतांनी विजयी झाले आहेत. कर्नाटकात काँग्रेसला मोठं बहुमत मिळताना दिसत आहे. अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. फटाके फोडताना काँग्रेस नेता थोडक्यात बचावला.

कर्नाटकात निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. कर्नाटकात काँग्रेसला मोठं बहुमत मिळताना दिसत आहे. दरम्यान, सकाळपासूनच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्साह साजरा करताना दिसत आहेत. अशातच मोठी दुर्घटना घडताना थोडक्यात टळली. फटाके पेटवताना काँग्रेस नेत्याचा तोल जाताना दिसत आहे. तोल गेल्याने त्यांच्या हातातला बॉक्स जमिनीवर पडतो. मात्र फटाके फुटत राहतात. त्यात ते तो बॉक्स उचलण्याचा प्रयत्न करतात, तितक्यात एक फटाका फुटतो आणि त्यांच्या डोळ्याच्या जवळून निघतो. सुदैवाने नेता थोडक्यात बचावतो. फटाके पेटवताना काँग्रेस नेत्याचा तोल जाताना दिसत आहे.

 

तोल गेल्याने त्यांच्या हातातला बॉक्स जमिनीवर पडतो. मात्र फटाके फुटत राहतात. त्यात ते तो बॉक्स उचलण्याचा प्रयत्न करतात, तितक्यात एक फटाका फुटतो आणि त्यांच्या डोळ्याच्या जवळून निघतो. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून राज्यात काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व स्थापित झाले आहे. भारतीय जनता पक्षाला सत्ता गमवावी लागल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून ट्रेंडमध्ये पक्ष 123 जागांवर आघाडीवर दिसत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम