प्रदेशाध्यक्ष बावनकुळेची करुणा शर्मांनी घेतली भेट ‘ही’ केली मागणी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ जुलै २०२३ ।  राज्यात गेल्या काही दिवसापासून करुणा शर्मा या वेगवेगळ्या बातम्याच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत येत असतात, त्या आता पुन्हा एकदा राजकीय चर्चेत आल्या आहे. नुकतीच करुणा शर्मा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली आहे. या भेटीवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. आजच्या भेटीदरम्यान करुणा शर्मा, रामदास आठवले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये दहा मिनिटं विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच करुणा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एक मोठी मागणी केली.

जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत आहेत. काही महिन्यांपूर्वी माझ्या कारमध्ये बंदूक ठेवण्यात आली होती. त्यानंतर आता परळीच्या लॉकअपमध्ये संशयित आरोपीचा मृत्यू झाला. संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांंचं तात्काळ निलंबन करावे अशी मागणी करुणा शर्मा यांच्यांकडून करण्यात आली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चाना मोठे उधाण आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम