आता तरी सरकारचे डोळे उघडावेत ; ठाकरेंचा ओढले ताशेरे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ जुलै २०२३ ।  राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात नागपूरहून पुण्याच्या दिशेने येत असताना समृद्धी महामार्गावर रात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 33 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यातील 8 प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. भीषण अपघात झाल्यानंतर केद्र व राज्य सरकारने सकाळीच मदत जाहीर केली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी थेट सरकारवर ताशेरे ओढले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत्त मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आतापर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत! बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जिवांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे, असे ठाकरे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम