“गाव गाड्यांचा सदर्भ” या काव्यसंग्रहाचे उद्या प्रकाशन अभिनेते व गीतकार मा.श्री बाबासाहेब सौदागर यांच्या हस्ते होणार

बातमी शेअर करा...

अमळनेर( आबिद शेख )अमळनेर येथे सुप्रसिद्ध कवी रमेश पवार लिखित गाव गाड्यांच्या पडझडीचे संदर्भ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक ३ जुलै २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे सकाळी १० वाजता साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे
‘गाव गाड्यांचा संदर्भ’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध सिने गीतकार व अभिनेते मा.श्री.बाबासाहेब सौदागर यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व विचारवंत डॉ.मिलिंद बागुल हे असतील यावेळी साहित्यिक प्रा प्रा बी एन चौधरी,साहित्यिक सुदाम महाजन,म वा मंडळाचे डॉ अविनाश जोशी, चित्रकार राजुजी बाविस्कर,अथर्व पब्लिकेशन चे संचालक युवराज माळी आदि मान्यवरांच्या उपस्थिती ने दर्जेदार अशी साहित्यिक मेजवानी रसिक श्रोत्यांना मिळणार आहे.तरी साहित्य चळवळीतील वाचक, लेखक,कवी आणि श्रोते यांनी मोठ्या संख्येने सदर प्रकाशन समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन कवी रमेश पवार मित्र परिवाराने केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम