
अमळनेर शहरात प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्यांविरुद्ध न.पा.ची कारवाई रु २६३००/-दंडवसूल
अमळनेर ( प्रतिनिधी)आज स्वच्छता विभागातील राज्य संवर्ग स्वच्छता निरीक्षक श्री युवराज चव्हाण तसेच संतोष बिऱ्हाडे तसेच न.पा.चे आरोग्य निरीक्षक हैबतराव पाटील, राधेश्याम अग्रवाल अतिक्रमण पथक सह न पा चे इतर कर्मचारी मार्फ़त अमळनेर शहर हद्दीतील दुकान दाराचे दुकानांची तपासणी केली असता संजय प्लास्टिक याचे कडे 75 micro पेक्षा कमी जाडी चा प्लास्टिक माल जप्त करण्यात आले व इतर देखील दुकानाची तपासणी केली असता एकूण 30 ते 40 किलो चा 75 micro पेक्षा कमी जाडी च्या माल जप्त करण्यात आले असे दुकान दार *संंजय प्लास्टिक, कोमल प्लास्टिक, कुबेर हाॅटेल,राजस्थान स्वीट, शिवशक्ती पावभाजी यांच्याकडून प्रत्येकी रु ५०००/-दंड वसूल करणेत आले* *एकूण दंड रु २६३००/-करण्यात आला आहे* यापुढे सतत सिंगल युज प्लास्टिक विक्री करणारे चा वापर करणारे दुकानदार अथवा नागरिक ल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम