कीर्तीने पतीसोबातचा शेअर केला व्हिडीओ ; म्हणाली…

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ ऑक्टोबर २०२२ । शरद आपला दमदार आवाज आणि अभिनय यामुळे रसिकांच्या मनावर राज्य करतोय. शरदची पत्नी कीर्ती उत्तम अभिनेत्री आहे. त्याची आणि कीर्तीची लव्ह स्टोरी खूपच रंजक आहे. जाणून घ्या शरद व कीर्तीची लव्हस्टोरी काय आहे ते ?
२००४मध्ये आक्रोश मालिकेच्या सेटवर शरद केळकर आणि कीर्ती पहिल्यांदा भेटले ते पहिल्याच नजरेत शरद कीर्तीच्या प्रेमात पडला. या मालिकेनंतर पुन्हा एकदा दोघं भेटले चार-पाच महिन्यांनी. सिंदूर तेरे नाम का आणि सात फेरे मालिकांच्या सेटवर. दोघं एकमेकांच्या जास्त जवळ यायला लागले. मग दोघंही डेटिंगही करत होते.

 

शरद केळकरनं एका मुलाखतीत सांगितलं होतं, कीर्तीबरोबर तो चार-पाच महिने रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर त्याला जाणवलं, तो काही तिच्याशिवाय राहू शकत नाही. तीही शरदच्या प्रेमात आकंठ बुडालेली. मग दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघंही मराठी असल्यानं घरून लगेच पसंती मिळाली. २००५ मध्ये लग्न झालं आणि २०१४ मध्ये त्यांचं पहिलं बाळ जन्मलं. कीर्ती म्हणाली, त्यांचं लग्न तीन दिवस सुरू होतं. यात ती इतकी थकून गेली की तिला इलेक्ट्राॅल प्यावं लागलं होतं. अर्थात, ती शरदशी लग्नगाठ बांधून आनंदातही होती. आता पुन्हा एकदा ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या हिंदी आवृत्तीसाठी प्रभासला शरद आवाज देतोय. त्यामुळे एकीकडे हर हर महादेव सिनेमांत बाजीप्रभूंची भूमिका आणि दुसरीकडे ‘आदिपुरुष’ सिनेमात श्रीराम या भूमिकेला आवाज. शरद म्हणतोय, हा योग सुखावणारा आहे. कलाकार म्हणून मला विविधांगी काम करायला मिळतंय याचं समाधान आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम