मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र व्हायरल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ ऑक्टोबर २०२२ । राज्यात राजकीय गटबाजी आता जनतेच्या समोर आलीच आहे, मात्र येणाऱ्या निवडणुकीत याचे पडघम कसे वाजतात हे मात्र अंधेरी पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत दिसायला लागले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी भेट घेतल्या नंतर आज सकाळी राज यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले आहे, ते सर्वत्र व्हायरल झाले आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, ऋतुजा पटेल आमदार होतील हे पहावं, असे आवाहन राज ठाकरेंनी फडणवीसांना केले आहे. त्याला फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले असून राज ठाकरेंनी केलेल्या मागणीचा विचार करू. मात्र, याबाबत पक्षात चर्चा करावी लागेल, असे फडणवीसांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने पत्र लिहिले आहे. त्याबाबत नक्की विचार करू. मात्र, पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा करावी लागेल. त्या बैठकीतच याबाबत निर्णय घेतला जाईल.

 

राज ठाकरेंचे पत्र.

 

राज ठाकरे यांनी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व आज मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत भाजप मनसेचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात होते. तसेच, शिवसेनेतील बंडानंतर राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेही ते या पोटनिवडणुकीत शिंदे गट व भाजपसोबत जातील, असे बोलले जात होते. मात्र, आज राज ठाकरे यांनी अचानक ऋतुजा लटके यांना आमदार होता यावे, यासाठी फडणवीसांना पत्र पाठवल्याने, त्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम