खा. शि मंडळाच्या डी आर कन्या शाळेत विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत

advt office
बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी):-
खा.शि.मंडळाच्या डी आर कन्या शाळेत शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळेत नवीन दाखल झालेल्या विद्यार्थिनींचे रांगोळ्या काढून,औक्षण करून,गुलाब पुष्प देऊन तसेच फुलाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले.पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थिनींना मोफत पाठ्युस्तके देखील देण्यात आले.यावेळी उपस्थित महिला व पुरुष पालक यांचे देखील शाळेमार्फत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या भाविका वाल्हे, घनिका मालुसरे यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शाळा समिती चेअरमन प्रदीप अग्रवाल, प्र. मुख्याध्यापक सी एस पाटील,पर्यवेक्षक एस पी बाविस्कर,डी एम दाभाडे,शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधु भगिनी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम