अंमळनेर नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने दारू, मटका, अवैध धंधे, जुगाराचे अड्डे केले उध्वस्त

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी ) नगरपरिषदेच्या शासकीय शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील जुगार अड्डे व अवैध व्यवसाय नगरपरिषदेने नेस्तनाबूत केले आहेत.
शासकीय संकुलातील अवैध व्यवसायिकांनी अतिक्रमण करून त्याठिकाणी दारू ,मटका जुगार सुरू केला होता. मच्छी बाजारात तर सठयाच्या मॉलच उभा केला होता तसेच सानेगुरुजी मार्केट मध्ये देखील जिन्याच्या खाली अतिक्रमण करून जुगार चालवला जात होता. त्यामुळे मच्छी मार्केट मध्ये सभ्य नागरिक व महिलांना लाज वाटत होती. नागरिकांची अनेक दिवसांपासून ओरड होती. पालिकेचे प्रशासक सीमा अहिरे , मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी संयुक्त रित्या पालिकेच्या मालमतेच्या आवारातील अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेतला.अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल , अविनाश बिऱ्हाडे ,जगदीश बिऱ्हाडे , यश लोहरे , विशाल सपकाळे , जयदित्य गजरे ,सुरेश चव्हाण , भूषण चव्हाण , विकास बिऱ्हाडे ,रफीक खान ,जितेंद्र चावरे यांच्या पथकाने अतिक्रमित झोपड्या ,ओटे ,शेड , तोडून त्याठिकाणी असलेल्या ,मटका जुगाराचे अड्डे उध्वस्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम