खडसे – महाजन पुन्हा भिडले ; महाजनांनी थेट मस्ती काढली !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादीने जळगाव जिल्ह्यात शरद पवारांच्या जंगी सभेचे आयोजन केले होते. यावेळी आ.एकनाथराव खडसे यांनी थेट शिंदे व फडणवीस सरकारवर हल्लबोल केला होता. त्यानंतर त्यांना प्रतिउत्तर म्हणून सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील खडसे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

काय म्हणाले खडसे ?
राज्यात आता खोक्याचं राज्य सुरू झालेले आहे. पैसा, माज, मस्ती आली आहे. हा माज आणि मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यसरकारवर केली.

गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे यांची मस्ती अजून जिरली नाही का? आमची मस्ती काढत आहात. दहा दहा मंत्रीपद घेताना तुम्हाला काही वाटलं नाही का? तुमची मस्ती लोकांनी आणि सर्व बांधकाम व्यावसायिकांनी पाहिली आहे. त्याची फळ तुम्ही भोगत आहात. आता उर बडवून काहीही उपयोग नाही. 30-35 वर्षे तुम्ही भाजपात होता. सगळ्यात जास्त पदं तुम्ही भोगली आहेत. आता दोन वर्षात तुम्हाला आमची मस्ती दिसली का? तुमची मस्ती लोकांनी उतरवली आहे. तुमचा विधानसभेत पराभव केला, दूध संघ आणि बँकेतून तुम्हाला हाकललं, तुमचं काय राहिलं आहे. आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहोत, असे महाजन म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम