भाजप नेते सोमयांच्या ‘त्या’ व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ सप्टेंबर २०२३ राज्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांचा गेल्या काही महिन्यापूर्वी एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता या व्हिडीओ पडसाद थेट विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात लावून धरला होता. व्हायरल व्हिडीओ प्रकरणी त्यांनी केलेल्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात एका खासगी वृत्ता वाहिनीचे संपादकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांचे व्हिडीओ एका खासगी वृत्त वाहिनीने दाखवले होते. त्यामुळे किरीट सोमय्या यांची बदनामी झाली होती. हे प्ररकण राज्यभर गाजले होते. काही पक्ष, संघटनांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन देखील केले होते. आता या प्रकरणात दोन संपादकांवर सायबर पोलिस उपायुक्त यांच्या देखरेखीखाली पूर्व सायबर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओबाबत किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

व्हायरल व्हिडीओ प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनुसार मुंबई गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आणि सायबर पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. मंगळवारी किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी आपला जबाब दिला आहे. त्या नंतर या प्रकरणाच्या तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर आता रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम