खडसे शिवसेनेत येणार की महाजन भाजपात जाणार; महाजन – खडसेंची मुक्ताईनगर फार्म हाऊसवर गुप्त बैठक

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ४ एप्रिल २०२४ | जळगाव लोकसभा मतदार संघातून पारोळा येथील करन पवार हे शिवसेना उ.बा.ठा. गटाचे उमेदवार राहणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत केली असून दुसरीकडे नेते एकनाथराव खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना जोरदार वेग आला आहे. दोन्ही घडामोडी घडत असताना जळगाव मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी देखील मुक्ताईनगर येथे नेते एकनाथराव खडसेंची भेट घेऊन मनमोकळेपणाने चर्चा केली आहे. दोघांच्या भेटीने शहरात अनेक चर्चा सुरू आहेत.

धान्याच्या किंमती बाबत सरकारचा मोठा निर्णय; साठेबाजी करणाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांचा भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारल्यानंतर उन्मेष पाटील आणि पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार असे दोघे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात सामील झाले. दोघांना शिवसेनेत आणण्यात जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत आणि मनपा माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा मोठा हाथ दिसून येत आहे. दोघांचा शिवसेनेत प्रवेश होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे हे दिल्लीत पोहचल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोरदार वेग आला आहे.

PM Kisan Yojana | ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता

 

दिल्लीतून जळगावात आल्यावर नेते एकनाथराव खडसेंनी आपल्या फार्म हाऊसवर काही निकटवर्तीय आणि सहकाऱ्यांशी गुप्त बैठक घेत चर्चा केली असून माध्यमांना देखील प्रतिक्रिया देत भाजप प्रवेशाबाबत चर्चा केल्या. जळगावात परतल्यावर मनपा माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी देखील मुक्ताईनगर येथे खडसेंची भेट घेऊन चर्चा केली आहे. महाजन-खडसे भेटीमध्ये वेगळे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. महाजन खडसेंना आपल्या गळाला लावत शिवसेनेत प्रवेश करवून घेतात की महाजन स्वतःच खडसेंसोबत भाजपत जातात असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

 

शिवसेना उ.बा.ठा.गटाचे उमेदवार करण पवार यांना विजयी करण्यासाठी विरोधी पक्षनेते सुनील महाजनांना देखील प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम