राष्ट्रवादीला खिंडार : कॉंग्रेसमध्ये अनेकांचा प्रवेश !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ फेब्रुवारी २०२३ । ठाण्यामध्ये राष्ट्रवादीला शिंदे गटाने मोठं खिंडार पाडलं आहे. तर दुसरीकडे मित्रपक्षात जाणाऱ्यां कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतल अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर आता भोर तालुक्यातून राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. आता महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या काँग्रेसने राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

पुणे जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली गळती राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद वाढल्याचे दिसून येणार आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपुर्वी माजी राज्यमंत्री विजयबाप्पू शिवतारे यांच्या नेतृत्वात बारामती लोकसभा इंदापूर तालुका, करमाळा सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटातील असंख्य पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुण्याच्या भोर तालुक्यात भावेखल येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थित आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्त्यांसह 91 जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश करण्याऱ्यांमध्ये बहुतांश जण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम