महिन्याच्या अखेरीस जाणून घ्या सोन्यासह चांदीचे दर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१  ऑगस्ट २०२३ | ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जागतिक आणि देशातील बाजारात सोने-चांदी सातत्याने आगेकूच करत होते. पण अमेरिकेतील घडामोडींमुळे सोने-चांदीला सूसाट धाव घेता येत नव्हती. डॉलर कमकूवत होताच, सोने-चांदीने मैदानात खुल के शक्तीप्रदर्शन केले. दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली. डॉलरची दहशत कमी झाली तर चीनने जागतिक बाजारात एका दमात खरेदीचे संकेत दिले आहेत. या दोन्ही सकारात्मक बाबी या धातूंच्या पथ्यावर पडल्या. जागतिक बाजारात सोने गेल्या चार आठवड्यातील उच्चांकावर पोहचले आहे. अजून त्याला जुने रेकॉर्ड गाठायला अवकाश आहे. पण या दोन दिवसांत सोन्याने 500 रुपयांची तर चांदीने 700 रुपयांची घौडदौड केली. ऑगस्टच्या मधल्या टप्प्यात झालेल्या घसरणीला या चढाईने उत्तर देण्यात आली. सप्टेंबर महिन्यात सणांची रेलचेल आहे, या दरम्यान सोने-चांदी कोणता पराक्रम गाजवतात, हे समोर येईलच.

ऑगस्टच्या अखेरच्या टप्प्यात सोन्याने आक्रमक धोरण घेतले. ऑगस्टच्या सुरुवातीला 1, 5 ऑगस्ट रोजी सोन्यात 100-150 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर दरवाढीला मोठा ब्रेक बसला. 21 ऑगस्ट रोजी सोने 50 रुपयांनी वाढले. 23, 24 ऑगस्ट रोजी किंमती अनुक्रमे 180, 200 रुपयांनी वाढल्या. 28 ऑगस्ट रोजी सोन्यात 50 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. 29 ऑगस्ट रोजी 250 रुपयांची दरवाढ झाली. 30 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट सोने 55,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,150 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.
16 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. 18 ऑगस्टला 1000 रुपयांनी किंमती वाढल्या. 19, 21 ऑगस्ट रोजी चांदी 200 रुपयांचा चढ-उतार दिसून आला. 22 ऑगस्ट रोजी 1300 रुपयांनी किंमती वधारल्या. 23 ऑगस्ट रोजी 500, 24 ऑगस्ट रोजी 1600, 26 ऑगस्टला 500, 29 ऑगस्टला 200 आणि 30 ऑगस्ट रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 77,600 रुपये आहे.

24 कॅरेट सोने 59,292 रुपये, 23 कॅरेट 59,055 रुपये, 22 कॅरेट सोने 54,312 रुपये, 18 कॅरेट 44469 रुपये, 14 कॅरेट सोने 34,686 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 74,661रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम