इथे होते ‘कुत्र्याची’ पूजा जाणून घ्या काय आहे प्रथा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ ऑक्टोबर २०२२ ।  देशात दिवाळीला धनत्रयोदशी आणि वसुबारसेला गायीची पूजा करून धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. तर २४ रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील धनलक्ष्मीची पूजा करण्यात आली. एका ठिकाणी आज चक्क कुत्र्याला झेंडूच्या फुलांचा हार घालून पूजा करण्यात आली.

नेपाळ हा भारतासारखाच हिंदू संस्कृती इथे पाळली जाते. नेपाळमध्ये दिवाळीसारखाच चार दिवसांचा सण असतो. त्याला तिहार म्हणतात. आपल्याकडे दिवे लावतात, दाराला झेंडुच्या फुलांचं तोरण लावतात, पणत्या लावतात. तसाच नेपाळचा हा तिहार सण. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी इथे कुत्र्याची पूजा केली जाते. त्याला झेंडुच्या फुलांचा हार घातला जातो. त्याला कुकुर तिहार असं म्हणतात. दिवाळीत नेपाळमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची पूजा करतात. आधी गाय, कुत्रा, मग कावळा, बैल आदींची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना फुलांचे हार घालतात. आपण गाय-बैलाला लावतो, त्याप्रमाणे कुत्र्याला गंध लावतात. त्यांना दही दिलं जातं. तसेच दूध आणि अंडीही देतात.

 

 

पण कुत्र्यांचं पूजन का केला जातं, असा प्रश्न आहे. तर नेपाळमधील हिंदु संस्कृतीनुसार, कुत्रा हा यमाचा दूत मानला जातो. आपल्या मृत्यूनंतरही कुत्रे आपलं रक्षण करतात, असा समज आहे. कुत्र्याने आपल्याबरोबर सदैव राहवं, यासाठी ही पूजा केली जाते. नेपाळमधील समज आणि श्रद्धा असली तरीही भटक्या कुत्र्यांना, भटक्या प्राण्यांना जेऊ घालण्याची आत्मीयता आपल्याकडेही अनेकजण बाळगतात. दिवाळीला रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना जेऊ घालतात. कोरोना काळात तर अनेक स्वयंसेवी संस्थांनी या प्राण्यांना जगवण्यासाठी सरकारकडून विशेष परवानगी घेऊन त्याना खाऊ घातलं, हेही विसरता येणार नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम