आजच्या होणाऱ्या सूर्यग्रहणाचा ‘या’ महिलांनी’ पडू नये घराबाहेर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ ऑक्टोबर २०२२ । यंदाचे या वर्षातील सर्वात शेवटचे सूर्यग्रहण हे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२२ रोजी मंगळवारी आज होत आहे. सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण असो, दोन्हीचा मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो. ज्योतिषांच्या मते, या काळात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जो व्यक्ती या काळात सांगितलेली खबरदारी घेत नाही, त्याला ग्रहणाच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग आज जाणून घेऊया या सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. असे म्हटले जाते की ग्रहणाचा गर्भवती महिलांवर अधिक परिणाम होतो. यादरम्यान काय काळजी घेणे आवश्यक आहे जाणून घेऊया.

सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय करू नये- ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. कारण यावेळी ग्रहणाची किरणे हानिकारक असतात, ज्याचा थेट परिणाम बाळावर होतो. यामागे कुठलीही अंधश्रद्धा नाही. ग्रहणाचा काळ सुरू होण्यापूर्वी पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने टाकावीत. हे पाणी तुम्ही ग्रहणानंतर किंवा ग्रहण काळात पिऊ शकता. तुळशीच्या पानांमुळे पाणी दूषित होत नाही. ग्रहणकाळात पाणी पिणे टाळावे, पण जर प्यायचेच असेल तर तुळशीची पाने टाकून ठेवलेले पाणी प्यावे किंवा या दरम्यान नारळाचे पाणी प्यावे.

ग्रहणाचा काळ हा अध्यात्माचा काळ मानला जातो. या दरम्यान आपल्या इष्टदेवतेचा मानसिक साधना करावी. या काळात गरोदर महिलांनी गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, सूर्य मंत्र, विष्णु मंत्र किंवा सुंदरकांडचा पाठ करावा. हे खूप फायदेशीर मानले जाते. याशिवाय आम्ही तुम्हाला सांगतो की, ग्रहण काळात देवाच्या मूर्तीला हात न लावता जप करावा.
ग्रहणाचा कुठला विपरीत परिणाम होईल म्हणून गर्भवती महिलांनी मानसिक ताण घेऊ नये. अनावश्यक मसनिक ताणामुळे बाळाला त्रास होऊ शकतो.
ग्रहण काळात झोपणे देखील निषिद्ध आहे, परंतु जर आजारपणात आणि गर्भधारणेदरम्यान उठणे शक्य नसेल तर तुम्ही देवाचे ध्यान करून झोपू शकता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम