कोहली पाडतोय मैदानावर धावांचा पाऊस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ मे २०२३ ।  राज्यात एन उन्हाळ्यात जोरदार पावसाची हजेरी होत आहे तशीच विराट कोहली देखील यंदा दमदार फॉर्मात आहे. विराट कोहली लागोपाठ धावांचा पाऊस पाडत आहे. दिल्लीविरोधातही विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. या खेळीनंतर विराट कोहलीने तीन विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहलीने आज अर्धशतकाचे अर्धशतक पूर्ण केलेय. असा पराक्रम करणारा विराट पहिला भारतीय खेळाडू आहे. तर आयपीएलमधील दुसरा खेळाडू ठरलाय. डेविड वॉर्नर याने याआधी अर्धशतकाचे अर्धशतक झळकावलेय.

रनमशीन विराट कोहली याने आज पुन्हा एकदा अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने पहिल्यापासूनच संयमी फलंदाजी करत आऱसीबीची धावसंख्या वाढवली. विराट कोहलीने आयपीएलमध्ये अर्धशतकाचे अर्धशतक झळकावले. त्याशिवाय आयपीएमध्ये सात हजार धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीने केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने आज पुन्हा एकदा अर्धशतक झळकावत आरसीबीच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये सहावे अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने ४६ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने पाच चौकार लगावले. विराट कोहलीने पहिल्या विकेटसाठी कर्णधार फाफ डु प्लेसिससोबत ८२ धावांची भागिदारी केली. तर तिसऱ्या विकेटसाठी महिपाल लोमरोर याच्यासोबत अर्धशतकी भागिदारी केली.
विराट कोहलीने दिल्लीविरोधात एक हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. त्याशिवाय विराट कोहलीने अर्धशतकाचे अर्धशतक झळकावलेय. तसेच आयपीएलमध्ये सात हजार धावांच पल्ला पार केला आहे. एका संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रमही विराट कोहलीने केलाय. विराट कोहलीने आरसीबीकडून खेळताना सात हजार पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीने आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावत विक्रमाला गवसणी घातली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम