कुशलच्या पोस्टने वेधले चाहत्यांचे लक्ष !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मार्च २०२३ । राज्यातील झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या शो मधून अभिनेता कुशल बद्रिके घराघरात पोहचला आहे. त्यामुळे तो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत देखील असतो. आपल्या विनोदी अभिनय कौशल्याने त्याने रसिकांच्या मनात घर केले. त्याच्या फॅन्सच्या संख्येतही खूप वाढ झाली आहे. कुशल सोशल मीडियावर सक्रीय असून तो फोटो आणि पोस्ट शेअर करत असते. दरम्यान आता त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर त्याचा खिडकीकडे पाहत असलेला फोटो शेअर करत लिहिले की, माणसं आपली असतात आणि नसतातही,जशी ती आपली असण्याची आपल्याला सवय असते, तशीच ती आपली नसल्याची सुद्धा सवय होते हळूहळू. नाही म्हणजे आठवण येते त्यांची, पण आता अगदी पूर्वीसारखं आयुष्य अडत नाही त्यांच्याशिवाय,सवयीने आपण आता दोन चहा, दोन कॉफी सांगत नाही, पावभाजी वर दोन पाव “एक्स्ट्रा” सांगत नाही, “वन बाय टू” चं शेअरिंग “मॅच्युरिटीच्या बेरिंग” मध्ये हरवून गेलय कुठेतरी.

त्याने पुढे म्हटले की, फक्त “आपल्याकडून माणसं जशी मागे सुटत जातात ना तसे, आपणही थोडे थोडे मागे सुटत जातो त्यांच्यासोबत”.पण तरीही एक दिवस सगळं नीट होईल ही संभावना रहातेच मनात. राहून गेल्या हाती,संभावनांच्या वेण्या ! विण गुंफता जीवाची, तू एकटा केविलवाण्या” !!-सुकून

कुशल बद्रिकेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला. या कार्यक्रमाव्यतिरिक्त त्याने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच तो पांडू या चित्रपटात झळकला होता. तसंच लवकरच तो ‘जत्रा २’ मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम