इतक्या छोट्या कारणाने शाहरुखने ठेवल्या लेडी बॉडीगार्ड्स !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मार्च २०२३ । जगभरातील करोडो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला ‘किंगखान’ शाहरूख खान हा जगभरात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. शाहरूखने पन्नाशी कधीच ओलांडलीये. पण आजही तरूणाई त्याच्यावर फिदा आहे.

त्यातही त्याच्या फिमेल फॅन्सची संख्या मोठी आहे. रोमान्सच्या या बादशहावर तरूणी जीव ओवाळून टाकतात. आजही शाहरूख दिसला की त्याच्या फिमेल फॅन्स अक्षरश: वेड्या होतात. शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी, त्याला स्पर्श करण्यासाठी, त्याला मिठी मारण्यासाठी तुटून पडतात. हेच कारण आहे की आता शाहरूखने स्वत:साठी लेडी बॉडीगार्ड्स नेमल्या आहेत. या लेडी बॉडीगार्ड्स आता शाहरूखचं फिमेल फॅन्सपासून रक्षण करणार आहेत. अर्थात कारण फक्त इतकं नाही, शाहरूखने स्वत:साठी लेडी बॉडीगार्ड्स नेमण्यामागं आणखीही एक कारण आहे.

” जेव्हा मी पब्लिक प्लेसमध्ये जातो,तेव्हा तिथे मुलींना माझ्याजवळ यायचं असतं माझ्यासोबत फोटो काढायचे असतात, माझ्यासोबत हात मिळवायचा असतो. पण त्या ज्या पद्धतीनं अंगावर येतात ते अनेकदा घाबरवणारं असतं. त्यामुळे मी लेडी बॉडीगार्ड्स नेमल्यात. मला प्रोटेक्ट करण्याच्या नादात माझे मेल बॉडीगार्ड्स मुलींना धक्का द्यायचे ते खूप उद्धटपणाचं वाटायचं मला. हे टाळण्यासाठी लेडी बॉडीगार्ड्स हा चांगला उपाय आहे, असं मला वाटतं”, असं तो म्हणाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम