अमळनेर शहरात आज कुस्त्यांची महा दंगल…… कुस्ती प्रेमी मध्ये उत्साह…
अमळनेर(आबिद शेख)अनेक वर्षांनंतर अमळनेर शहरात खड्डा जीन च्या मैदानावर ७ नोव्हेंबर रोजी महान भारत केसरी पैलवान भारत मदने(बारामती) व महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक (सोलापूर) यांच्यात महाकुस्ती चा सामना रंगणार आहे. कुस्ती प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
अनेक वर्षांनंतर अमळनेर शहरात कुस्त्यांची महादंगल होत असल्याने कुस्ती प्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे.
भारत मदने व बाला रफिक यांच्या लढतीसाठी अडीच लाखांचा इनाम ठेवण्यात आला आहे. यासह बबलू पैलवान चाळीसगाव व शाकिरनुर पैलवान मेरठ , हितेश पाटील पाचोरा व सैफअली पंजाबी मालेगाव , निजामअली अमळनेर व करण देवरे चाळीसगाव , सोपान माळी चाळीसगाव व शादाब पैलवान भुसावळ , पवन शिंपी अमळनेर व अज्जू पैलवान कासोदा , मोईनअली अहमदनगर व सोनू पैलवान अमळनेर ,अमन पैलवान भुसावळ व योगराज चौधरी अमळनेर , ऋषिकेश पाटील अमळनेर व समाधान पाटील तरवाडे , फरहान पैलवान रावेर व बंटी शिंदे जळगाव यांच्यातही कुस्तीचे सामने रंगणार आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमळनेर तालीम संघाचे शब्बीर पैलवान ,माजी नगरसेवक संजय पाटील(भूत बापू), संजय भिला पाटील , माजी नगरसेवक प्रताप शिंपी , महाराष्ट्र चॅम्पियन रावसाहेब पाटील , विनोद निकम , तालुका कुस्तीगीर संघाचे बाळू पाटील ,भरत पवार परिश्रम घेत आहेत. या कुस्त्यांच्या महादंगलीसाठी पंच म्हणून जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख , मल्लविद्या कुस्तीगीर अध्यक्ष आण्णा कोळी , आदिल पैलवान , राजू पाटील काम पाहणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम