
बातमीदार | २५ ऑक्टोबर २०२३
गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. नाशिकनंतर (शिंदे) देवळा तालुक्यात मंगळवारी कोट्यवधींचा ड्रग्जसाठा मुंबई पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ललित पाटीलचा वाहनचालक सचिन वाघ याने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने गिरणा नदीपात्रात फेकलेले ड्रग्ज एनडीआरएफच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस कसोशीने करत आहेत. नदीपात्रात फेकलेला ड्रग्जचा साठा किती आहे, हे अद्याप समजू शकले नसले तरी पोलिसांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नव्हते.
ललित पाटीलचा चालक सचिन वाघ देवळा तालुक्यातील पिंपळगाव (वा.) येथील असून, नातेवाइकांच्या माध्यमातून ड्रग्जचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याने ही जागा निवडल्याचा संशय आहे. पंधरा दिवसांपूर्वी शिंदे (नाशिक) येथे मुंबई पोलिसांनी ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केला आणि त्यानंतर इतर अनेक जिल्ह्यांत छापे टाकत मी ड्रग्ज आणि अवैध धंद्यांविरोधात कारवाई करत कोट्यवधींचा माल हस्तगत केला. ललित पाटीलच्या सांगण्यावरून सचिन वाघने ड्रग्ज लपवल्याचा किंवा त्यांची विल्हेवाट लावल्याचा पोलिसांना संशय आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम