माहिती अधिकार कार्यकर्त्याला मारहाणीत खून !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ ऑक्टोबर २०२३

राज्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत असतांना यात भुसावळ शहराचे नाव जोरदार चर्चेत येत असते. गेल्या दोन महिन्याआधी एकाच दिवशी तीन खून झाल्याची घटना ताजी असतांना आज दसऱ्याच्या दिवशी मध्यरात्री माहिती अधिकार कार्यकर्त्याला काही अनोळखीनी मारहाण करीत खून केल्याची घटना घडली आहे. गेल्या आठ दिवसापासून पोलीस प्रशासन नवरात्रोसत्वाच्या बंदोबस्ताला होती तर घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील गरूड प्लॉट परिसरात दोस्ती मंडळाच्या जवळ दि.२४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दिलीप जोनवाल यांच्यावर अज्ञात मारेकर्‍यांनी प्राणघातक हल्ला केल्याने यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने पोलीस प्रशासनावर आधीच बंदोबस्तावर असतांना रात्री झालेल्या या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शहरातील मध्यवर्ती परिसरात दिलीप जोनवाल ( वय ४९, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ ) यांचा खून झाल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या कृत्याला पूर्व वैमनस्याची जोड असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवली आहेत. तर मयत दिलीप जोनवाल हे माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम