लायन्स क्लब अमळनेर व मारवड वि.का.सो तर्फे जनावरांच्या लम्पी लसीकरण शिबिराचे आयोजन

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)
लायन्स क्लब अमळनेर व मारवड विविध कार्यकारी सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने मारवड येथे जनावरांच्या लम्पी या आजाराचे मोफत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.हे शिबिर ३ सप्टेंबर,शनिवार रोजी सकाळी ८ वाजेपासून मारवड वि.का.सोसायटी संकुल आवारात होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाळीव तसेच इतर जनावरांमध्ये लम्पी या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आढळून येत असून शेतकरी संकटात सापडला आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी व जनजागृतीसाठी या शिबिराचा लाभ होणार आहे. जनावरांच्या होणाऱ्या लम्पी त्वचा रोग संबंधी आजारांवर प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. मारवड,गोवर्धन व बोरगाव येथील शेतकऱ्यांना हे शिबीर उपयुक्त ठरणार असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन लायन्स चे प्रेसिडेंट योगेश मुंदडे तसेच मारवड वि.का.सो.चे चेअरमन राकेश मुंदडे सोबतच लायन्स व वि.का.सो चे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम