‘उशीरा आलेल्यांना आधी जेवण’ ; शिंदे गटातील आमदारांची नाराजी कायम !

बातमी शेअर करा...

राज्यातील राष्ट्रवादीने भाजप शिवसेनेसोबत एकत्र येत सत्तेत सहभागी झाले असून यातील राष्ट्रवादीच्या अजित पवारांसह आठ आमदारांना मंत्रीपद मिळाल्यानंतर राज्यातील शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या बातम्या सुरु होत्या. आता पुन्हा एकदा मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या भेटी वाढल्या आहे.

काल रात्री उशिरा शिंदे आणि फडणवीस यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तासभर बैठक सुरु होती. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर ही बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने त्यावरही या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची आशा होती. मात्र, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने ही आशा मावळली आहे. त्यामुळे आमदार नाराज आहेत. त्यातच ‘उशीरा आलेल्यांना आधी जेवण’ अशा शब्दात आमदारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला होता. त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी शिंदे – फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम