विरोधकांच्या दुसऱ्या दिवशीच्या बैठकीसाठी शरद पवार रवाना !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जुलै २०२३ । देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी निवडणुकीत हरविण्यासाठी देशातील सर्वच विरोधकांनी एकत्र येत पहिल्या दिवशी बैठक झाली होती. त्यात राज्यातील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गैरगजर राहिले होते पण आज दुसऱ्या दिवशीच्या बैठकीसाठी शरद पवार रवाना झाल्याची बातमी समोर आली आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांचे 26 पक्ष एकत्र येत आहेत. यापूर्वी 23 जून रोजी पाटण्यात झालेल्या विरोधी ऐक्याच्या पहिल्या बैठकीत 17 पक्ष सहभागी झाले होते.

मंगळवारी होणाऱ्या बैठकीत समान्य किमान कार्यक्रम, राज्यनिहाय युती, जागावाटप आणि महाआघाडीच्या नव्या नावावर चर्चा होऊ शकते. सर्व पक्षांशी समन्वय साधण्यासाठी समन्वयक नेमण्याबाबत चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी किंवा नितीश कुमार यांना संयोजक बनवले जाऊ शकते. सोनिया गांधी यांच्या नावाला कोणत्याही पक्षाची हरकत नाही, कारण त्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार नसतील. मात्र, या पदाबाबत वाद निर्माण झाल्यास काँग्रेस मागे पडू शकते, असा दावाही केला जात आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेसने सोमवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेवायला बोलावले होते. यात २६ पक्षांचे नेते सहभागी झाल्याचे काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. पक्षात फूट पडल्यानंतर आजच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शरद पवार थेट पोहोचणार आहेत.

बैठकीपूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, विवेक तन्खा आणि डीके शिवकुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. समान नागरी संहिता (यूसीसी) आणि विरोधी पक्षांचे नेते या प्रश्नावर वेणुगोपाल पत्रकारांवर संतापले. ते म्हणाले- मणिपूरमध्ये 75 दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. यावर पंतप्रधान मौन बाळगून आहेत. विरोधकांनी गप्प राहावे असे सरकारला वाटते. राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करण्यासारखे मोठे मुद्दे आहेत. देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. तुम्ही लोक यावर प्रश्नच उपस्थित करू नका. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले- काही नेते आज येत नाहीत, उद्या येतील आणि उद्या सकाळी ही बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता बैठक सुरू होईल आणि सर्व पक्षांचे नेते दुपारी 4 वाजता देशाला संबोधित करतील, पण आमच्या पाटणा सभेनंतर अचानक पंतप्रधानांना एनडीएचा विचार आला. एनडीएमध्ये नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम