वडोदकर फाउंडेशन, रोटरी गोल्डसिटीतर्फे मोफत काविळ चिकित्सा शिबिरास प्रारंभ

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 02.07.2022 | जळगांव येथील डॉ. वडोदकर मेडिकल फाउंडेशन, मीरा आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय व संशोधन केंद्र तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने महाबळ बस स्टॉप येथे मोफत कावीळ निदान व चिकित्सा शिबिराचा शुभारंभ झाला.

शिबिराचे उद्घाटन डॉ.दीपक अटल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक अध्यक्ष सुनील आडवाणी यांनी तर शिबिराविषयीची माहिती डॉ. सुभाष वडोदकर यांनी दिली. हे शिबिर महीनाभर चालणार असून आयुर्वेद तज्ञ वैद्य सुभाष वडोदकर व वैद्य प्रणिता वडोदकर हे तपासणी करणार आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जितेंद्र अग्रवाल, डॉ. नीरज अग्रवाल, प्रीती मंडोरा, स्वप्निल पलोड, प्रखर मेहता, राहुल कोठारी, राहुल कोटेचा, धरम साखला, नीलेश जैन, हर्षदीप आडवाणी, अमोल असावा, डॉ. प्राची पाटील व प्रणव वडोदकर यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम