गावठी कट्टा बाळगणाऱ्यास LCB कडून अटक
पोना श्रीकृष्ण देशमुख यांना पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्या हस्ते 10 हजाराचे रिवॉर्ड
गावठी कट्टा बाळगणाऱ्यास LCB कडून अटक
पोना श्रीकृष्ण देशमुख यांना पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्या हस्ते 10 हजाराचे रिवॉर्ड
जळगांव l प्रतिनिधी
वरणगाव शहरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार एक 19 वर्षीय तरुण गावठी कट्टा बाळगून आहे. त्याची खात्री झाल्याने LCB चे वरिष्ठ पो. नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस ताब्यात घेऊन वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यामुळे सदर पथकातील पोना श्रीकृष्ण देशमुख यांना पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते 10 हजाराचे रिवॉर्ड देण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, वरणगाव शहरातील आंबेडकर नगर येथिल हरिष उजलेकर यांचे जवळ गावठी
कट्टा बाळगत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावर LCB चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोह प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, उदय कापडणे, रविंद्र चौधरी सर्व नेम. LCB जळगाव अशांचे पथक तयार करून
तात्काळ हरिष उजलेकर, आंबेडकर नगर वरणगाव याची
माहिती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यावरून हरिष उजलेकर, आंबेडकर
नगर वरणगाव शहरात मिळून आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे
नाव हरिष उर्फ हर्ष राहुल उजलेकर, वय १९, रा. आंबेडकर नगर, वरणगाव असे सांगीतले त्यावरून त्याचे अंगझडती घेता त्याचे ताब्यात ४०,०००/- रु. कि. चे २ गावठी बनावटीची पिस्टल व २ जिवंत काडतुस मिळून आल्याने त्यास ताब्यात
घेवून त्याचे विरुध्द
वरणगाव पो.स्टे.CCTNS NO १३६ / २०२४ शस्त्र अधिनियम ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल
करून त्याची वैद्यकिय तपासणी करून त्यास सदर गुन्ह्याचे पुढील तपासकामी वरणगाव पो.स्टे.चे ताब्यात
देण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर राजकुमार शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम