विधीमंडळ आज पाठविणार शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस !
बातमीदार | ३ ऑक्टोबर २०२३
गेल्या वर्षभरापासून शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षाची आता मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना फुटीनंतरच्या पेच प्रसंगानंतरची आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर या सुनावणीला वेग आला आहे. यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधीमंडळ नोटीस पाठवणार असल्याची माहिती विधीमंडळ विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आल्याचं यातून दिसून येत आहे. दोन्ही नेत्यांना पुरावे सादर करण्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे लवकरच एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. जुलै २०२२मध्ये नेमकी शिवसेनेची सूत्रे कोणाच्या हातात होती? हे तपासले जाणार असल्याची माहिती आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम