केसांमध्ये पडल्या उवां ; अशी घ्या काळजी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० ऑक्टोबर २०२३

सध्या राज्यातील अनेक भागात उन्हाचे चटके बसू लागले आहे. याच उन्हाळ्यात अनेकांच्या केसांची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवित असते. लोक स्पेशल हेयर केयर रूटीन फॉलो करतात. एवढं करूनही अनेक जण केसांच्या उवांच्या समस्येला बळी पडतात. विशेषत: लहान मुलांच्या केसांमध्येही उवांची समस्या खूप जास्त असते.

तुम्हाच्या किंवा तुमच्या मुलांच्या केसात उवा किंवा निट्स असतील तर टेंशन घेऊ नका. काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून काही मिनिटांतच सुटका मिळवू शकता.
केसांमधील उवा आणि निट्सपासून मुक्त होण्यासाठी लोक महागडे हेअर केअर प्रोडक्ट्स वापरतात. परंतु त्यानेही केस पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. आम्‍ही तुम्‍हाला उवांपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोपे उपाय सांगत आहोत. याचा वापर करून तुम्‍ही काही क्षणात उवांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

व्हिनेगर वापरा
व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही उवांच्या समस्येला कायमचा निरोप देऊ शकता. यासाठी केसांना डिस्टिल्ड व्हिनेगर लावा आणि काही वेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवा. डिस्टिल्ड व्हिनेगरऐवजी तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगर देखील वापरू शकता.

ऑलिव्ह ऑईल
केसांना ऑलिव्ह ऑईल लावून तुम्ही उवांची समस्या मुळापासून दूर करू शकता. ऑलिव्ह ऑइल लावल्याने उवांचा जीव गुदमरतो. त्यामुळे केसातील सर्व उवा मरतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ऑलिव्ह ऑईलमध्ये बडीशेप मिक्स करून केसांना लावू शकता.

टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइल हे अँटी-मायक्रोबियल घटकांचा उत्तम स्रोत मानला जातो. यासाठी आठवड्यातून तीन वेळा केसांना टी ट्री ऑइल लावा. यामुळे केसांमधील उवांची समस्या पूर्णपणे दूर होईल.

पेट्रोलियम जेली
पेट्रोलियम जेली वापरून तुम्ही उवांपासून मुक्ती मिळवू शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी केसांना पेट्रोलियम जेली लावा आणि टॉवेलने केस झाकून ठेवा. सकाळी उठल्यानंतर केसांना बेबी ऑइल लावून कंगवा करा. यामुळे केसांतील सर्व उवा निघून जातील.

लसणाची पेस्ट
केसातील उवा दूर करण्यासाठी तुम्ही लसूण पेस्ट लावू शकता. यासाठी 8 ते 10 लसूण पाकळ्या बारीक करून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये लिंबाचा रस घालून केसांना लावा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने केस धुवा.

कांद्याचा रस
कांद्याचा रस लावून केसातील उवांपासूनही सुटका मिळते. यासाठी कांद्याचा रस काढून केसांना लावा आणि 3 ते 4 तासांनी केसांमधून कंगवा फिरवून केस शॅम्पूने धुवा. आठवड्यातून 3 ते 4 वेळा हा उपाय केल्यास उवा सहज निघून जातील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम