..अन महानायक बच्चन देखील रडू लागले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० ऑक्टोबर २०२३

देशभरात हिंदी चंदेरीदुनियेत महानायक म्हणून ओळख निर्माण केलेले अमिताभ बच्चन यंदाच्या वर्षी त्यांचा 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. इथं संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहतावर्ग या काळ गाजवणाऱ्या अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या तयारीला लागला असतानाच तिथं काही मंडळींनी त्यांना एक खास Surprise देत आश्चर्यचकितही केलं आहे. आपल्यापोटी इतरांनी व्यक्त केलेलं हे प्रेम पाहून बिग बिंनाही अश्रू थांबवणं शक्यच झालं नाही.

‘कौन बनेगा करोडपती’ च्या संपूर्ण टीमनं बिग बींसाठी काहीतरी खास बेत आखल्याचं कार्यक्रमाच्या एका प्रोमोवरूनच पाहायला मिळत आहे. सर्वांनी मिळून केलेले हे प्रयत्न आणि मनापासून दिलेल्या शुभेच्छा पाहताना बच्चन यांनाही गहिवरून आलं आणि एखाद्या लहान मुलानं जसं रडावं अगदी तसेच अमिताभ बच्चन रडू लागले. डोंगराएवढी मोठी कारकिर्द असणाऱ्या या कलाकाराला असं रडताना पाहून तिथं असणाऱ्या चाहत्यांचेही डोळे पाणावले.

असीमित प्रेम देणाऱ्या चाहत्यांना आणि कलाकार मित्रांना धन्यवाद म्हणताना बिग बी म्हणाले, ‘आता आणखी किती रडवणार? पुरे आता..’ केबीसीमध्ये एखाद्या स्पर्धकाच्या जीवनाविषयी जाणून घेताना बिग बी तिथं आधारवड होताना दिसतात. याचाच संदर्भ देत, ‘मी नेहमी इतरांना अश्रू टीपायला टिश्यू देतो आज माझीच वेळ आली’ असंही ते म्हणाले. या मंचावर माझा वाढदिवस कायमच उत्तम पद्धतीनं साजरा केला जातो असं म्हणत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम