दै. बातमीदार । २२ एप्रिल २०२३ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आत्मघाती बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. सोमवारपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून त्याआधीच हल्ल्याची धमकी देणारं पत्र मिळालं आहे. एका पत्रातून देण्यात आल्याचा दावा केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी केरळातील पहिल्या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन कार्यक्रमाला जाणार आहेत.
सुरेंद्रन म्हणाले, “PM मोदींवर हल्ल्याचं पत्र कोचीमधील एका व्यक्तीनं मल्याळम भाषेत लिहिलं आहे. हे पत्र एक आठवड्यापूर्वी भाजपच्या कार्यालयाला प्राप्त झालं आहे. हे पत्र पोलीस महासंचालकांकडं सुपूर्द करण्यात आलं आहे”
माध्यमांतील रिपोर्टनुसार, “पोलीस अधिकाऱ्यांनी एन. के. जॉनी नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून ज्याच्या पत्त्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला होता. या पत्रामध्ये मोदींना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासारखेच उडवण्याची धमकी देण्यात आली होती. जॉनी हा कोचीचा रहिवासी असून आपण हे पत्र लिहिलं नसल्याचं त्यानं म्हटलं आहे” जॉनी यानं म्हटलं की, “पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन पत्राबद्दल चौकशी केली. पोलिसांनी या पत्रातील हस्ताक्षराचं माझ्या हस्ताक्षराशी तपासणी करुन पाहिली. त्यानंतर त्यांना लक्षात आलं की त्यानं हे पत्र लिहिलेलं नाही. उलट त्याच्याशी वैर बाळगणारी व्यक्ती या धमकीसाठी जबाबदार असू शकते तसेच पोलिसांना ज्यांच्यावर संशय आहे त्यांची नावं पोलिसांनी उघड करावीत असंही यावेळी म्हटलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम