लायन्स क्लब तर्फे प्रशासनाला राष्ट्रध्वजाचे वाटप

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित हर घर तिरंगा हे अभियान सर्वत्र राबवले जात असतांना येथील लायन्स क्लबतर्फे प्रशासनाला राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.
अमळनेर पालिका व महसूल विभागातर्फे मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती.त्या रॅलीला लायन्स क्लब चे सदस्य उपस्थित होते.यावेळी लायन्स क्लब तर्फे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याकडे राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आले.यावेळी लायन्स क्लब चे प्रेसिडेंट योगेश मुंदडे,सेक्रेटरी महावीर पहाडे,ट्रेझरर अनिल रायसोनी,झोन चेअरमन नीरज अग्रवाल,सदस्य प्रदीप अग्रवाल,प्रीतम मणियार,लालू सोनी, महेंद्र पाटील उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम