छोट्या व्यावसायिक बंधूंना लायन्सची सावली

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)

येथील लायन्स क्लब व लिओ क्लबला लायन्स डिस्ट्रिक्ट कडून छोट्या व्यवसायिक बंधूंना उपयुक्त ठरतील अशा मोठ्या दहा छत्र्या मिळाल्या आहेत. दोन्ही क्लबने गरजूंना त्याचे वाटप केले आहे. डिस्ट्रिक्ट कडून लायन्स क्लबला आठ तर लिओ क्लबला दोन छत्र्या मिळाल्या आहेत. या मोठ्या छत्र्यांमुळे उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिक बंधूंना पुरेशी सावली प्राप्त होणार आहे. त्यामुळे दिवसभर उन्हामध्ये थांबणे त्यांच्यासाठी काहीसे सुकर होणार आहे. या छत्र्यांचे वितरण सुभाष चौक, गीता प्रोव्हीजन ,सुदीप मेडिकल जवळ व शितलनाथ मंदिराजवळ उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या बंधूंना करण्यात आले.
यावेळी क्लबचे अध्यक्ष योगेश मुंदडे, सेक्रेटरी महावीर पहाडे, ट्रेझरर अनिल रायसोनी, डिस्ट्रिक्ट जीएसटी कॉर्डिनेटर रिजन – २ एमजेएफ विनोद अग्रवाल, पंकज मुंदडे, जितेंद्र जैन, प्रदीप अग्रवाल ,प्रकाश शहा अभिनय मुंदडा ,राजू नांढा, चेतन जैन, नीरज अग्रवाल, महेश पवार, प्रसन्न पारख, हितेश शहा, पीडीजी डॉ.रवींद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम