डाॅ. कपिलदेव सहदेव पाटील यांची मुंबई पोलिस सर्जन पदी नियुक्ती

चाळीसगाव तालुक्याला लाभले पहिल्यांदाच एवढे मानाचे पद

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०६ ऑगस्ट २०२२ । हिरापूर येथील रहिवाशी तथा तालुक्यातील वाघळी प्राथमिक आरोग्य केंद्रात काम पाहिलेले वैद्यकीय अधिकारी तथा सध्या वाशी ता उस्मानाबाद येथे कार्यरत वैद्यकीय अधिक्षक ( Medical Suprintendent ) डाॅ कपिलदेव सहदेव पाटील यांची राज्य सरकारच्या मुंबई पोलिस सर्जन ( पोलिस शल्य चिकित्सक- हे पद सिव्हील सर्जन समकक्ष आहे ) या पदी पदोन्नतीने नियुक्ती झाल्याने तालुक्यातून त्यांचेवर सर्वञ कौतुकाचा वर्षाव होत आह.

त्यांनी MD व DNB ( Forensic Medicine ) यवतमाळ येथे केले असून संपुर्ण राज्यात अशा प्रकारेण दोन्ही पदव्या घेतलेले ते एकमेव वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांचे वडिल श्री सहदेव पाटील बँकेत कार्यरत होते, ते संघर्षमय परिस्थितीतून आलेले असून त्यांची मुंबई पोलिस सर्जन झालेबद्दल महाराष्ट्र राज्य राजपञित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे ( MAGMO ) राज्याध्यक्ष डाॅ राजेश गायकवाड, डाॅ प्रमोद रक्षमवार, संघटक डाॅ प्रमोद सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम