महात्मा गांधी जयंती निमित्त लायन्स क्लब अमळनेर तर्फे सायकल रॅली… ०२ ते ०८ ऑक्टोबर दरम्यान साजरा करणार सेवा सप्ताह.

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)
राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त लायन्स क्लब अमळनेर तर्फे भव्य सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले.
लायन्स क्लब अमळनेर तर्फे ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर दरम्यान सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून त्या सप्ताह अंतर्गत २ ऑक्टोबर रोजी सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले.रॅलीच्या माध्यमातून “शहराला प्रदूषण मुक्त करूया..एक दिवस वाहने टाळूयात” हा सामाजिक संदेश देण्यात आला.यावेळी रॅलीत १०० पेक्षा जास्त सायकलस्वार सहभागी झाले होते.रॅलीची सुरवात छत्रपती शिवाजी नाट्यगृहापासून पुढे स्टेशन रोड,सुभाष चौक,तिरंगा चौक,बस स्टॅन्ड,विश्रामगृह,मंगलमूर्ती चौक तर सांगता बजरंग सुपर मार्केट याठिकाणी झाली.यावेळी स्पर्धकांना अल्पोपहार देण्यात आला.
यावेळी रॅलीत लायन्स प्रेसिडेंट योगेश मुंदडे,ट्रेझरर अनिल रायसोनी, झोन चेअरमन नीरज अग्रवाल,एमजेएफ विनोद अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन प्रशांत सिंघवी,माजी प्रांतपाल डॉक्टर रवींद्र कुलकर्णी,मुकुंद विसपुते,डॉक्टर बाविस्कर दादा,राजेश भाई शाह,प्रदीप अग्रवाल,महेश पवार,अजय हिंदुजा, श्याम गोकलानी,राजू नांडा, सुशील पारख,प्रसन्ना पारख,पिंटू शेठ लुनावत,बाळू कोठारी,डॉ.मिलिंद नवसारीकर,लालू सोनी,प्रीतम मनियार,महेंद्र पाटील,दिलीप गांधी लिओ चे गौतम मुंदडा,कुशल गोलेछा, रोटरी क्लबचे अविनाश अमृतकार,प्रताप कॉलेजचे सचिन पाटील,जीएस हायस्कूलचे बी एस पाटील,आर जे पाटील,एस.पी.वाघ तसेच जि.एस.हायस्कूल चे एनसीसी चे विद्यार्थी सहभागी होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम