भाजपच्या देण्गीदाराची यादी जाहीर ; आदानी- अंबानी नव्हे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ फेब्रुवारी २०२३ । राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये सर्वात जास्त देणग्या अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षालाच मिळाल्या आहेत; पण भारतीय जनता पक्षाला देणग्या देणाऱ्यांच्या यादीमध्ये आदानी- अंबानी हे ग्रुप नसून भाजपाचा सर्वात मोठा देणगीदार हा मित्तल ग्रुप आहे.

भाजपाला ज्या देणग्या मिळाल्या आहेत त्यापैकी सर्वात मोठा देणगीदार हा प्रुडेंट एलक्‍टोरल ट्रस्ट ही संघटना आहे. या संघटनेला अनेक कंपन्या आपल्या देणग्या देतात आणि नंतर हा ट्रस्ट राजकीय पक्षांना देणगी देतो. या ट्रस्टने भाजपाला 331 कोटींची देणगी दिली असून या ट्रस्टमध्ये ज्या विविध कंपन्या आहेत, त्यामध्ये तब्बल 72 टक्के वाटा हा मित्तल ग्रुपचा आहे.
2021/22 या वर्षांमध्ये मुकेश अंबानी किंवा त्यांची एखादी कंपनी किंवा अदानी आणि त्यांची एखादी कंपनी यापैकी कोणीही भाजपला देणगी दिलेली नाही भाजपला वर्षांमध्ये जी 614 कोटी देणगी मिळाली त्यापैकी 55% पेक्षा जास्त देणगी या ट्रस्टच्या माध्यमातूनच मिळाली आहे या ट्रस्टने जी देणगी भाजपाला दिली त्यापैकी 28% पेक्षा जास्त रक्कम स्टील टायकुन लक्ष्मी मित्तल यांच्या आर्सेनल ग्रुप कडून आली आहे.

11 टक्के देणगी भारती एअरटेल या कंपनीकडून तर दहा टक्के देणगी सिरम इन्स्टिट्यूटकडून आली आहे. हा ट्रस्ट खास राजकीय पक्षांना देणग्या देण्यासाठी स्थापन करण्यात आला असून या ट्रस्टला विविध कंपन्या आणि उद्योगपती वैयक्तिकरित्या देणग्या देतात. त्यानंतर या ट्रस्टच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणग्या दिल्या जातात. या ट्रस्टने ज्याप्रमाणे भाजपाला सर्वात जास्त देणगी दिली आहे.

तशाच प्रकारे देशातील बहुतेक सर्व प्रमुख राजकीय पक्षांना या ट्रस्टच्या माध्यमातून देणग्या देण्यात आल्या आहेत अर्थात अशा प्रकारचे ट्रस्ट असोत किंवा वैयक्तिक देणगीदार त्यांच्यामार्फत ज्या राजकीय पक्षांना देणग्या मिळतात त्यामध्ये भाजप एक नंबरला असून दुसऱ्या क्रमांकावर दक्षिणेतील द्रमुक पक्ष असून तिसऱ्या क्रमांकाला टीआरएस हा पक्ष आहे. त्यांना अनुक्रमे 308 कोटी आणि 193 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर कॉंग्रेस पक्ष असून या पक्षाला 95 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. निवडणूक आयोगाकडे जी माहिती उपलब्ध झाली आहे. देशातील नऊ राजकीय पक्षांना एक रुपयाही देणगी मिळालेली नाही. त्यामध्ये बसपा, नॅशनल कॉन्फरन्स, सीपीआयएम अशा काही प्रमुख राजकीय पक्षांचाही समावेश आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम