संत महात्म्याचे सत्संग वचन श्रवण केल्याने दुष्कृत्ते दूर होतात -पुज्य पंकजजी महाराज

बातमी शेअर करा...

भडगाव – प्रतिनिधी

परम संत बाबा जयगुरुदेव आश्रम मथुरा येथून १४ डिसेंबर २२ रोजी शाकाहार व सद्गुणी बनण्याचा संदेश देणे, मद्यपान सोडण्याचे अवाहन करणे, अध्यात्मिक चेतना जागृत करणे, सामाजिक एकोपा आणणे, आध्यात्मिक, वैचारिक क्रांतीचे वातावरण निर्माण करणे आणि समाजाची उभारणी करण्यासाठी जयगुरुदेवजी महाराजांचे उत्तराधिकारी आणि संस्थाप्रमुख पूज्य पंकजजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ६ राज्य ७७ दिवसीय आध्यात्मिक धार्मिक जनजागृती यात्रा काल ३ जानेवारी सायंकाळी भडगाव येथे शासकीय आय टी आय जवळ, सोमनाथ पाटील यांच्या शेतात पोहोचली. यावेळी पंकजजी महाराज यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते ‌

आज ४ जानेवारी रोजी येथे सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंचावर पूज्य पंकजजी महाराजांचे भडगाव संगत अध्यक्ष प्रवीण भिकन पाटील, पाचोरा अध्यक्ष हिरामण सांडू पाटील, पाचोरा भाजप अध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव भाजप अध्यक्ष अमोल पाटील, सोमनाथ पाटील, विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद बोरसे, नाना हाडपे, बन्सीलाल पाटील, गोविंद शेलार, शरद हिरे, गणेश वाघ, साजन पाटील, मयुर मालपुरे, धनराज पाटील, पवन मोरे पाटील, विठ्ठल पोपट पाटील, विकास विश्वनाथशेठ भावसार, योगेश कोळी, प्रकाश किसन कणखरे, सहयोगी संगत महाराजगंजचे अध्यक्ष वीरेंद्र कुमार आदिंनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.
आपल्या प्रवचनात ते म्हणाले “सत्संग जल जो कोई पावे, मैलाई सब कटी कटी जावे” ही ओळ उद्धृत करत सत्संग हे असे पाणी आहे जिथे कावळा आंघोळ करतो आणि हंस बनतो, संत महात्म्यांचे सत्संग वचन श्रवण केल्याने दुष्कृत्ये दूर होतात आणि सुरत शब्दाचा खरा मार्ग सापडतो असे म्हणायचे आहे. महाराजांनी भगवंताच्या उपासनेचा खरा मार्ग सांगितला आणि आचरणात आणले लोकांना हे रोज करत राहायला सांगितले यामध्ये घर, कुटुंब, शेती, नोकरी सोडण्याची गरज नाही चोवीस तासांपैकी सकाळ व संध्याकाळ प्रत्येकी एक तास सूरत शब्दाच्या अभ्यासात घालवावाणे ही दैवी संपत्ती मृत्यूच्या वेळी तुमच्या आत्म्यासोबत जाईल महात्म्यांचा संदेश अतिशय साधा आणि सरळ आहे. बारा वर्षांवरील कोणीही हे करू शकते. त्यांनी मथुरा येथील जयगुरुदेव आश्रम येथे होळी सणानिमित्त ७, ८ व ९ मार्च रोजी आयोजित होळी सत्संग मेळाव्यात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. म्हणाले येथे धन्य जयगुरुदेव महाराजांचे मंदिर बांधले आहे. तिथे दुर्गुण अर्पण करून मनोकामना पूर्ण होतात. येथे सर्व धर्माचे लोक येतात. तेथे येऊन दया, आशीर्वाद मिळवा. हजारो गायींची सेवा मोफत, शाळा, मोफत भंडारा लंगर, मोफत हॉस्पिटलचे ऑपरेशन संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या गोड पाण्याचा मोफत पुरवठा या कामांचाही त्यांनी उल्लेख केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम