एकाच तिकिटावर करता येतोय दोन रेल्वेने प्रवास ; जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ फेब्रुवारी २०२३ । आपण नेहमीच ट्रेन सुटण्याच्या ठीकानापार्यात जाण्यासाठी लोकलचे तिकीट काढत असतो पण आता तुम्हाला या प्रश्नापासून सुटका मिळणार आहे. एक्स्प्रेसच्या तिकीटाने आपण ट्रेन सुटण्याच्या ठिकाणापर्यंत जातो. मात्र तुम्हाला एक्स्प्रेस तिकीटावर लोकलने प्रवास करता येता का याबाबत आज आम्ही नियम सांगणार आहोत. म्हणजेच एकाच तिकिटावर तुम्हाला दोन रेल्वेत प्रवास करावा लागत आहे.

ते सुटण्याच्या वेळेच्या सहा तास आधी लोकल ट्रेनने मुंबई महानगर प्रदेशातील कोठूनही बोर्डिंग पॉईंटपर्यंत प्रवास करू शकतात. त्याचप्रमाणे बाहेरच्या गाड्यांमधून शहरात येणारे प्रवासीही ते ज्या स्थानकावर उतरतात तेथून सहा तासांच्या आत लोकल ट्रेनने प्रवास करू शकतात.जर तुमच्याकडे लांब पल्ल्याच्या गाडीचं कन्फर्म तिकीट असेल तर तुम्ही त्या तिकीटावर लोकलने प्रवास करू शकता.

या तिकीटाच्या मदतीने तुम्ही बोर्डिंग स्टेशन म्हणजेच जिथून तुमची ट्रेन सुटणार आहे तिथे जाऊ शकता अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसंच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे प्रवासी देखील मुंबईत उतरल्यानंतर लोकलने प्रवास करू शकतात. फक्त हा नियम 6 तासांपर्यंतच लागू राहातो. त्यामुळे तुम्ही ज्या दिवशी प्रवास करणार असाल त्या दिवशी किंवा उतरल्यानंतर 6 तासांच्या आत प्रवास करणं बंधनकारक आहे. कोणत्याही बाहेरच्या ट्रेनसाठी व्हॅलिड कन्फर्म तिकीट असलेल्यांना नॉन रिटर्न लोकल ट्रेनचे तिकीट खरेदी करण्याची परवानगी दिली जाईल.
अर्थात यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बोर्डिंग स्टेशन जर CST असेल तर तुम्ही दादरवरून CST ला जाऊ शकता. मात्र तुमचं तिकीट कल्याणवरून असेल तर मात्र तुम्हाला तिकीट काढून कल्याणपर्यंत जावं लागेल. त्यानंतर तुम्ही ट्रेनने प्रवास करू शकता. याचं कारण असं की CST ते कल्याण तुमच्याकडे तिकीट नाही. मात्र तुम्ही एक्स्प्रेसचं तिकीट दाखवून लोकलचं तिकीट घेऊ शकता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम