सोन्यासह चांदी झाली स्वस्त ; जाणून घ्या आजचे दर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ फेब्रुवारी २०२३ । राज्यात जानेवारी महिन्यापासून लग्न सराईची धूम सुरु होत असल्याने सोने व चांदीचे दरात वाढ होत होती पण गेल्या दोन दिवसापासून या दरात घसरण झाल्याचे चित्र बाजारात दिसून आले आहे. सोन्या-चांदीच्या किमती रोज बदलतात. आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीत बदल झाला आहे. सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. सोने आता 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली ट्रेड करत आहे. तर चांदीची किंमत 65,000 रुपये प्रति किलो आहे.

GST सोडून आज सोनं 55 हजार 900 रुपयांवर आहे. तर 23 कॅरेट सोन्याचे दर 54 हजार रुपयांवर आला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 52 हजारवर पोहोचला आहे. तुम्ही लग्नासाठी किंवा गुंतवणूक म्हणून जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. सोन्याची किंमत पुन्हा वाढण्याआधी आताच तुम्ही बुक करू शकता. नव्या वर्षात सोन्याच्या किंमती म्हणाव्या तेवढ्या कमी आल्या नाहीत. सतत सोन्या-चांदीचे दर बदलत आहेत. त्यामुळे सोनं आता खाली असेल तर संध्याकाळपर्यंत किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इतर धातूंबद्दल बोलायचे झाले तर आज तांबे, जस्त आणि शिशाच्या किमतीही घसरत आहेत. तांबे 0.34 टक्क्यांनी घसरून 781.85 रुपये झाले. झिंक 0.05 टक्क्यांनी स्वस्त होऊन 273.20 रुपयांवर आले. शिशाबद्दल बोलायचे झाल्यास, या कालावधीत त्याची किंमत 0.38 टक्क्यांनी घसरली आणि ती 182.30 रुपये होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम