स्वत:ला खोलीत बंद करुन घेतलं ; गौहर खानचा खळबळजनक आरोप !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ ऑक्टोबर २०२३

देशभरातील अनेक अभिनेते व अभिनेत्रीचे खाजगी आयुष्य नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत येत असतांना नुकतेच ‘बिग बॉस’ मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौहर खान खूप लोकप्रिय असून अभिनेत्री होण्याआधी ती मॉडेल राहिली आहे. गौहर खानने नुकत्याच एका मुलाखतीत तिला आलेला धक्कादायक अनुभव सांगितला. त्या एका घटनेनंतर तिने स्वत:ला खोलीत बंद करुन घेतलं होतं तेही एका सुपरस्टारमुळे. त्याच्यामुळे ती खूप जास्त घाबरली होती.

गौहरने ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. यावेळी तिने नाव न घेता एका सुपरस्टारसोबत आलेला अनुभव सांगितला. तेव्हा ती १८ वर्षांची होती. तसंच तो सुपरस्टार आता हयातीत नाही असा खुलासा तिने केला. ती त्यांच्या अभिनयाची फॅन होती. गौहर म्हणाली, “ते माझा हातच सोडत नव्हते. माझ्यासाठी तो फार विचित्र अनुभव होता. मी कसा माझा हात सोडवून घेणार होते? मी पूर्ण मुलाखतीत तशीच बसून राहिले. माझा हात त्यांच्या हातातच होता आणि ते हात सोडण्याचं नावच घेत नव्हते.”

ती पुढे म्हणाली, “मी त्यांच्या कामाची चाहती होते आणि म्हणूनच मला त्यांना नाराज करायचं नव्हतं. दिग्दर्शकाला हे समजलं होतं की काय चालू आहे. शूट झाल्यानंतर दिग्दर्शकाने मला खोलीत जाऊन बसायला सांगितलं. त्यांनी मला असं का सांगितलं हे मला कळलंच नाही. मी खोलीत जाऊन स्वत:ला बंद करुन घेतलं.”
तो सुपरस्टार गौहरला तिचा नंबरही मागत होता. ती कुठे आहे आणि जाण्याच्या आधी मला का नाही भेटली असंही तो विचारत होता. गौहर तेव्हा शॉक झाली होती. नक्की काय होतंय हे तिला कळलंच नाही. गौहरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती पुन्हा टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे. डान्स रिएलिटी शो ‘झलक दिखला जा 11’ ची ती होस्ट असणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम