एटीएम कार्डांची अदलाबदल करून लुबाडणूक

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ सप्टेंबर २०२२ । शहरात एटीएम कार्डांची अदलाबदल करून लुबाडणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. अशाच एका घटनेत एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या तरुणाची रक्कम काढून देण्याच्या बहाण्याने तीन अज्ञात ठगांनी फसवणूक केल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कांचन नगर येथे आपल्या कुटुंबासह राहत असलेला दीपक सोनवणे हा १९ वर्षीय तरुण शनिवार (दि.१७) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भिलपूरा चौकातील ओव्हरसीज बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता, पैसे निघत नसल्याने तेथे उभ्या असलेल्या तीन व्यक्तींनी दीपक यास पैसे काढण्यास मदत केली. यावेळी तीनही ठगांनी त्याच्या एटीएम कार्डाचा पिन पाहून घेतला व त्यास चकवा देत कार्डांची अदलाबदल केली व सदरील तरुणाच्या खात्यातून वीस हजार रुपये काढले.

दरम्यान, याप्रकरणी सोनवणे याच्या तक्रारीवरून, अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम