पुन्हा पाऊस घालणार थैमान? हवामान विभागाचा अंदाज

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ सप्टेंबर २०२२ । मागील काही दिवसांपासून शहरात हाहाकार माजवणारा पाऊस आज काही ठिकाणी शांत झाला आहे. पण शांत असलेला हा पाऊस पुन्हा येणार असल्याकारणाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. पुढील तीन दिवस होणारा हा मध्यम स्वरूपाचा पाऊस १ ते ३ ऑक्टोबरपर्यंत सातपुडा ओलांडत खान्देशात येणार आहे. याचबरोबर विजयादशमीला पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मात्र सततच्या पावसामुळे पुरसदृश परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनंतचतुर्दशीच्या दिवसानंतर झालेल्या या भरमसाठ पावसामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले.

आता परतीचा मान्सून खान्देशातून ५ ऑक्टाेबरपासून परत जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. ५ ते ७ ऑक्टाेबर राेजी उत्तर महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जाेर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर पावसाचा जोर ओसणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम