दै. बातमीदार । ३१ मार्च २०२३ । सध्या बदलत्या आहारामुळे अनेकांचे वजनाचे प्रमाण वाढून गेले आहे. त्यामुळे शरीराचे वाढते वजन ही जणू एक समस्याच झाली आहे. वजन कमी करण्याच्या बाबतीत, आपल्या चयापचयाची भूमिका खूप महत्वाची ठरते. जर तुमची चयापचय ची क्षमता चांगली किंवा वेगवान असेल, तर तुमच्या शरीरातील कॅलरीज कमी करणे तुमच्यासाठी फारसे कठीण होणार नाही.
जर तुमची चयापचय कमकुवत असेल, तर तुम्हाला व्यायाम करूनही कॅलरीज कमी करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. चयापचय ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपले शरीर अन्न आणि पेय यांचे उर्जेमध्ये रूपांतर करते. ते जितके चांगले असेल तितके तुमच्यासाठी चरबी कमी करणे सोपे होईल. चयापचय वाढवण्यासाठी, तुम्ही व्यायामासोबत आहार आणि झोपेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
1) सेलेरी डिटॉक्स पाणी –
एक चमचा सेलेरी एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी ते पाणी चांगले उकळून घेऊन प्यावे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात लिंबाचा रस आणि दालचिनी देखील घालू शकता.
2) मिंट ग्रीन टी-
सर्वप्रथम एका कपमध्ये गरम पाणी घ्या आणि त्यात ग्रीन टी बॅग टाका. एक मिनिट तसेच ठेऊन टी-बॅग काढा आणि त्यात पुदिन्याची पाने, लिंबाचा रस आणि मध घालुन त्याचे सेवन करा.
3) जिरे आणि दालचिनी पाणी-
एका भांड्यात 4 चमचे जिरे आणि दालचिनी यांचे मिश्रण करून घ्या.आणि ते पाणी गरम करून पाणी गाळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करा.
4) लिंबू आणि आले पाणी-
आले कापून त्याचे लहान तुकडे करा. ते तुकडे मिक्सर मध्ये टाकून बारीक करा. नंतर ते मिश्रण एका ग्लासमध्ये काढून घेऊन त्यात लिंबाचा रस आणि भाजलेले जिरे पूड घाला. केलेले मिश्रण चांगले मिसळून घ्या आणि त्याचे सेवन करा. जे तुमचे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम