LPG सिलिंडर झाला स्वस्त, वाचा काय आहेत नवीन दर
दै. बातमीदार । २ एप्रिल २०२४ । लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने जनतेला स्वस्त एलपीजी सिलिंडरची भेट दिली आहे. सरकारी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी (१ एप्रिल) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट केली आहे. सिलिंडरच्या दरात कपात झाल्यानंतर महागाईतून जनतेला नक्कीच दिलासा मिळणार आहे.
तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ३२ रुपयांची कपात केली आहे. नवीन दर १ एप्रिलपासून लागू झाले आहेत. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडर (१४ किलो) च्या किमती स्थिर आहेत आणि त्यांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर जुन्याच दरात मिळत राहतील.
काय आहे १९ किलोच्या सिलेंडरची किंमत
सोमवारी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ३०.५० रुपयांनी कपात केल्यानंतर राजधानी दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १,७६४.५० रुपये झाली आहे. तर पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,८७९ रुपयांपर्यंत वाढली आहे. कोलकातामध्ये सिलिंडरच्या दरात ३२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर मुंबईत १९ किलो सिलेंडरच्या किमतीत ३१.५० रुपयांनी कपात केल्यानंतर तो १,७१७.५० रुपयांना उपलब्ध झाला आहे. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,९३० रुपये झाली आहे. येथे सिलेंडरची किंमत ३०.५० रुपयांनी कमी झाली आहे.
मार्च महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती
गेल्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली होती. खरं तर, महिला दिनानिमित्त (८ मार्च २०२४), पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी LPG सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची सूट जाहीर केली होती. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे ७ मार्चला मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही दिलासा देण्याचे बोलले होते. त्यानंतर मंत्रिमंडळाने ३१ मार्च २०२५ पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलिंडरवर ३०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम