लखनऊचा कोलकात्यावर 1 धावेने विजय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ मे २०२३ ।  सध्या देशात आयपीएल-१६ मधील ६८ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर १ धावेने विजय मिळवला.कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात लखनऊने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला 20 षटकांत 7 गडी गमावून 175 धावांपर्यंतच मजल मारता आली.

BJP add

कोलकाताकडून रिंकू सिंहने सर्वाधिक नाबाद 67 धावांची झुंजार खेळी केली. मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्यानंतर जेसन रॉयने 45, तर व्यंकटेश अय्यरने 24 धावा केल्या. लखनऊकडून यश ठाकूर आणि रवि बिश्नोईने प्रत्येकी 2, तर कृणाल पंड्या आणि कृष्णप्पा गौतमने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तत्पूर्वी कोलकाताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 षटकांत 8 गडी गमावून 176 धावा करत कोलकाताला विजयासाठी 177 धावांचे आव्हान दिले.

याचा पाठलाग करताना कोलकाताला ओपनर जेसन रॉय आणि व्यंकटेश अय्यरने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी केली. सहाव्या षटकात व्यंकटेश अय्यरला 24 धावांवर बाद करत कृष्णप्पा गौतमने ही भागीदारी मोडली. तर नवव्या षटकात रवि बिश्नोईने नितीश राणाला 8 धावांवर बाद करत कोलकाताला दुसरा झटका दिला. तर पुढच्याच षटकात कृणाल पंड्याने जेसन रॉयला 45 धावांवर बाद केले. त्यानंतर चौदाव्या षटकात यश ठाकूरने रहमानुल्लाह गुरबाजला 10 धावांवर बाद केले. तर सोळाव्या षटकात रवि बिश्नोईने आंद्रे रसेलला 7 धावांवर बाद केले. यानंतर अठराव्या षटकात यश ठाकूरने शार्दुल ठाकूरला 3 धावांवर बाद झाले. तर याच षटकात सुनील नारायण धावबाद झाला. त्यानंतर रिंकू सिंहने नाबाद 67 धावांची खेळी करत संघाला शेवटपर्यंत सामन्यात कायम ठेवले. रिंकू सिंह आणि वैभव अरोराने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाची धावसंख्या 175 वर नेली. मात्र त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम