महाराणा प्रतापसिंहजी यांची ४८३ वी जयंती जल्लोषात साजरी

बातमी शेअर करा...

प्रतिनिधी | भडगाव :-

महाराणा प्रतापसिंहजी यांची ४८३ वी जयंती मिरवणूक
सोमवार दि .२२ रोजी शहरात जल्लोषात साजरी करण्यात आली. येथील हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंहजी चौकात भव्य असे प्रतिमा पूजन ढोल पारंपरिक वाद्य, ढोल ताशांसह फटाक्याच्या आतिष बाजीत साजरा करण्यात आला. यावेळी सर्व समाज बांधवांच्या उपस्थित पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, बापुजी फाऊंडेशन अध्यक्ष लाखीचंद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, गणेश परदेशी , विजय भोसले, मनोहर चौधरी, योजना ताई पाटील, डॉ निलेश पाटील, आयोजन समिती आदीं च्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात केले.
—-
सजवलेल्या रथावर महाराणा प्रताप यांचा भव्य पुतळा साकारण्यात आला होता . घोड्यावरून राणी जयवंताबाई, महाराणा प्रताप सिह आदी महापुरुषांच्या वेशभूषा बालकांनी साकारली होती . तर फटाक्यांच्या आतिषबाजीने व महाराणा प्रताप सिह कि जय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. मिरवणुकीत तरुणांनी एकच जल्लोष केला.

बाळद रोड श्री साईबाबा मंदीर पासून मिरवणुकीस सुरुवात झाली होती. चाळीसगाव रोड येथे महाराणा प्रतापसिंह यांचे नाम फलक पुजन , यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक , डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक , क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले चौक येथील नाम फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला .
मेनरोड वरील पवनपुत्र हनुमान मंदीरास पुष्पहार अर्पण करून बाजार चौक येथील श्री राम मंदिर येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
मिरवणुकीचे आयोजन जयंती उत्सव समिती भडगाव यांनी केले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम