महाविकास आघाडी अलर्ट ; पटोले व ठाकरेंची एकांत भेट !
बातमीदार | १४ ऑगस्ट २०२३ | राज्यातील भाजप व शिंदे गटासोबत अजित पवारांनी नवीन संसार सुरु केल्यानंतर त्यांनी वारवार शरद पवार यांची भेट घेतल्याने राज्यातील महाविकास आघाडी अलर्ट झाली असून आता कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची एकांत भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ निर्माण झाली आहे.
या संदर्भात आपण राहुल गांधी यांनाही माहिती दिली असल्याचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत, त्यांच्याशी एकांतात चर्चा केली. शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे दिसून येतेय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि I.N.D.I.A. आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या गुप्त भेटीने राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वत: शरद पवार यांनीही दोन वेळा स्पष्टीकरण दिले आहे. तरी देखील आघाडीमधील पक्षांमध्ये संभ्रम कायम आहे.
या संदर्भात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील गुप्त भेटीविषयी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच हायकमांड देखील यावर लक्ष ठेवून आहे. आम्ही संभ्रमात नसून जनतेत संभ्रम आहे. अजित पवार त्यांचे नातेवाईक आहे. पण गाडीत झोपून जाणे आणि गुप्तपणे बैठक घेणे हे आघाडीसाठी चिंताजनक असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम