महाविकास आघाडीत फुट नाहीच ; संजय सावंत !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २० सप्टेंबर २०२३

राष्ट्रवादीत बंडखोरी कडून अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी वेगळा गट बनविला होता. त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांच्या दोन ते तीन वेळा भेट घेतल्याने मोठी राजकीय चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

राऊत म्हणाले की, त्यांच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम त्यांनी पाहावा. यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणतीही फूट पडणार नाही. प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत? हे मला माहिती नाही. पण, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत हे मला माहिती आहेत. शरद पवारा यांनी त्यांच्या पक्षातील फुटीर गटाविरोधात निवडणूक आयोग व न्यायालयात खटला दाखल केला आहे. तसेच, फुटीर आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिकाही दाखल केली आहे, असे संजय राऊत म्हणाले. अजित पवार यांच्या नेतृत्वात गत जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झाली. अजित पवारांसह त्यांचे समर्थक आमदार सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर अजित यांनी थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर दावा सांगितला. प्रफुल्ल पटेल यांचाही त्यांच्या या बंडखोरीला पाठिंबा होता. या पार्श्वभूमीवर पटेल यांनी पवारांची भेट घेतल्यामुळे तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम