राज ठाकरे मुकेश अंबानीच्या भेटीला !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २० सप्टेंबर २०२३ | राज्यात नुकतेच कालपासून गणरायांचे आगमन जल्लोषात झाले आहे. भक्तांकडून अतिशय वाजत-गाजत, घोषणाबाजी करत बाप्पाचं स्वागत करण्यात आलंय. विशेष म्हणजे राज्यातील दिग्गज नेते, अभिनेते, अभिनेत्री, कलाकार, सेलिब्रिटी, उद्योगपतींच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालंय. देशाचे सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालंय. त्यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कुटुंबासह गेले. राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुकेश अंबानी यांच्या भेटीचा फोटो समोर आलाय.

मुकेश अंबानी यांच्या ‘एंटीलिया’ या निवासस्थानी आज गणपती बाप्पाचं आगमन झालंय. गणपतीच्या आगमनाच्या निमित्ताने अंबानींच्या ‘एंटीलिया’ बंगल्यात चांगलीच लगबग बघायला मिळाली. जगभरातील आणि देशातील अनेक नामांकीत व्यक्ती अंबानींच्या घरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे हे देखील अंबानींच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला गेले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम